हळद लागवडीबाबत खेड पंचायत समितीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:30 AM2021-05-23T04:30:10+5:302021-05-23T04:30:10+5:30
खेड : शेतकरी बांधवांना हळद लागवड करण्यामध्ये रुची निर्माण व्हावी म्हणून येथील पंचायत समिती सेस निधीतून कृषीसाठी निधी राखीव ...
खेड : शेतकरी बांधवांना हळद लागवड करण्यामध्ये रुची निर्माण व्हावी म्हणून येथील
पंचायत समिती सेस निधीतून कृषीसाठी निधी राखीव ठेवून अनुदानावर शेतकऱ्यांना
बियाणे व खते देणार आहेत़ याबाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत असून, नियोजनबद्ध दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसभापती जीवन आंब्रे यांनी दिली.
आमदार योगेश कदम यांनी प्रोत्साहन दिले असून, लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी सभापती, उपसभापती व अधिकाऱ्यांना दिले आहे. शेतकऱ्यांना हळद लागवडीचे शास्त्रोक्त मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती स्तरावरुन युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यकांचे सहकार्य घेणार आहेत.
आतापर्यंत शेतकरी, बचतगट स्वयंसेवी संस्थेतर्फे वीस क्विंटलची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आल्याची माहिती उपसभापती जीवन आंब्रे यांनी दिली. शेतकऱ्यांना
मदत व मार्गदर्शन करण्यासाठी खेड पंचायत समिती सदैव अग्रेसर आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा व या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन उपसभापती जीवन आंब्रे यांनी केले
आहे.