साहित्य चळवळ टिकून राहण्यासाठी पुढाकार घ्यावा : गजानन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:01+5:302021-08-25T04:36:01+5:30
रत्नागिरी : मराठी भाषा ही पूर्वापार चालत आलेली आणि प्राचीन भाषा आहे. प्रसार माध्यमांच्या काळात मराठी भाषा आणि साहित्य ...
रत्नागिरी : मराठी भाषा ही पूर्वापार चालत आलेली आणि प्राचीन भाषा आहे. प्रसार माध्यमांच्या काळात मराठी भाषा आणि साहित्य चळवळ टिकून राहण्यासाठी सर्वांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय गटातील कथाकथन आणि महाविद्यालयीन गटासाठी काव्यवाचन स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील बोलत होते. यावेळी समिती सदस्य राजेंद्र शिंदे, युवाशक्ती दक्षिण जिल्हा अध्यक्ष अरूण मोर्ये, खजिनदार विद्याधर तांदळे उपस्थित होते.
कथाकथन स्पर्धेत लहान गटात आर्या रानडे, आरोही लिंगायत, ओम धोपटकर आणि मोठ्या गटात स्वरा मोरे, गार्गी घनवटकर, चिन्मयी मयेकर यांनी तर महाविद्यालयीन गटात ईशा केळकर, अनुष्का बापट, श्वेता केळकर यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक व आदित्य बापट यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, ग्रंथभेट आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले.
कथाकथन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. शशांक पाटील, रामानंद लिमये तर काव्यवाचन स्पर्धेसाठी रवींद्र मेहेंदळे व अमेय धोपटकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष शुभदा मुळ्ये, सूत्रसंचलन कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर, स्मिता बापट, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, स्पृहा लिंगायत यांनी प्रयत्न केले.
यावेळी ग्रंथपाल श्रुती केळकर, सत्कोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश थुळ, कांबळे लावगण शाळेचे मुख्याध्यापक सुशील वासावे, आनंद लिंगायत उपस्थित होते.