कशेळी येथे झालेल्या हाणामारातील त्या जखमी वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:18 PM2021-05-08T12:18:44+5:302021-05-08T12:20:35+5:30
Crimenews Rajapur Ratnagiri : सामाईक जमिनीच्या वाटप हिस्स्यावरून सख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला़ याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (६८) याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर : सामाईक जमिनीच्या वाटप हिस्स्यावरून सख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरूवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला़ याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (६८) याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशेळी सावरेवाडी येथील महादेव ठुकरूल व शांताराम ठुकरूल या दोन भावांमध्ये सामाईक जमिनीच्या वाटपावरून गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाद झाला. या वादातून महादेव ठुकरूल याने शांताराम ठुकरूल यांच्यावर धारदार सुऱ्याने डोक्यावर व पायावर वार केले. यामध्ये शांताराम ठुकरूल गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचे निधन झाले.
याबाबत उत्कर्ष अरविंद ठुकरूल यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर नाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ घटनेनंतर महादेव ठुकरूल यांनी जंगलात पळ काढला होता. नाटे पोलिसांनी त्याला जंगलातून पकडून आणले. याकामी नाटेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, गोपनीय अंमलदार दीपक काळे, सहाय्यक पोलीस फौजदार विवेक साळवी, पोलीस नाईक दिनेश कांबळे, हवालदार नरेंद्र जाधव, चालक प्रसाद शिवलकर यांनी काम पाहिले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळुंखे व फॉरन्सिंग युनिट दाखल झाले होते.