मुर्शी चेक पोस्टवर स्थानिक वाहनचालकांना दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:40+5:302021-09-21T04:35:40+5:30
देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. ...
देवरुख : रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. तब्बल दीड महिना झाला तरी हा मार्ग मोकळा करण्यात आला नाही. आता केवळ हलक्या वाहनांची येथून ये-जा सुरू आहे. मुर्शी साखरपा येथे पोलीस चेकपोस्ट येथे सहाचाकी वाहने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जाण्यास पोलिसांकडून अटकाव केला जातो. मात्र, रात्री पैसे घेऊन काही वाहने सोडण्यात येतात, असा आरोप स्थानिक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
आंबा घाट येथे घाट वाहतुकीस बंद असल्याबाबत सूचना देणारे माहिती फलक किंवा कोणीही पोलीस कर्मचारी तैनात केलेला नाही. त्यामुळे बाहेरील मोठ-मोठी अवजड वाहने थेट मुर्शी साखरप्यापर्यंत बिनदिक्कतपणे येतात. साखरपा येथे घाटातून आलेल्या वाहनांवर केवळ जुजबी दंडाची कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. पाचशे रुपये दंड आकारून अवजड वाहने सोडली जातात. त्यामुळे स्थानिक वाहनांनासुद्धा मालवाहतुकीस परवानगी दिली जावी, अशी मागणी आहे.
सोमवारी तालुक्यातील चाळीसहून अधिक वाहनधारकांनी साखरपा पोलीस चेकपोस्ट येथे धडक दिली. जर अवजड मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव, उमेश गांधी, योगेश चव्हाण, ओंकार सुर्वे, महेश पाटील, योगेश केतकर, राजन मोहिरे यांच्यासह साखरपा, देवरूख विभागातील वाहनधारक उपस्थित होते.
200921\1735-img-20210920-wa0033.jpg~200921\img-20210920-wa0034.jpg
फलक मुर्शी~या सारखी अनेक अवजड वाहने साखरपा येथे पोलीसांकडुन 500रुपये जुजबी दंड घेऊन सोडुन दिली