पावस येथे वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:09+5:302021-06-04T04:24:09+5:30
पावस : जिल्ह्यात लाॅकडाऊनची घाेषणा हाेताच रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकातर्फे बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. बंदाेबस्तावेळी ...
पावस : जिल्ह्यात लाॅकडाऊनची घाेषणा हाेताच रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकातर्फे बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. बंदाेबस्तावेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांच्या ओळखपत्राची खात्री करूनच त्यांना साेडण्यात आले. पावस परिसरात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती.
पावस परिसरात पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवून वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली हाेती. या मार्गावरून कामावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात आली. कामावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र अनिवार्य केले आहे. ओळखपत्र नसल्यास त्या कर्मचाऱ्याला घरी पाठविण्यात येईल, अशी सक्त सूचना पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश गावित यांनी दिली. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
--------------------------
पावस परिसरात पूर्णगड सागरी पाेलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कसून तपासणी केली.(छाया : दिनेश कदम)