शिवशाही बसचे हप्ते थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:51 AM2018-07-26T04:51:07+5:302018-07-26T04:51:50+5:30

विभाग नियंत्रकांची मध्यस्थी; दोन दिवसांत पैसे भरण्याचे आश्वासन

The installments of the Shivshahi bus were tired | शिवशाही बसचे हप्ते थकले

शिवशाही बसचे हप्ते थकले

googlenewsNext

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात सर्वत्र शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. भाडेतत्त्वावर या बसेस महामंडळाने घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून या गाड्या घेतल्या आहेत, त्यापैकी दोन गाड्यांचे हप्ते थकल्याने कंपनीचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत बुधवारी दाखल झाले आहेत. विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थीमुळे कंपनीने दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही दिल्यामुळे तूर्तास तरी जप्तीची कारवाई टळली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भाडेतत्त्वावर शिवशाही बसेस चालविण्यासाठी घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून शिवशाही बसेस घेतल्या आहेत, त्या कंपनीने कर्जावर गाड्या घेतल्या आहेत. कर्जाचे हप्ते संबंधित कंपनीकडून थकल्याने बुधवारी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्सचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी माळनाका येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी संबधित कंपनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून याची माहिती दिली. त्या वेळी दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही कंपनीने दिल्यावर फायनान्स कंपनीचे कर्मचारी कोल्हापूरला परत फिरले आहेत.
गतवर्षीपासून अत्याधुनिक सोईसुविधा असलेल्या ‘शिवशाही’ गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या. रत्नागिरी विभागात एकूण ५३ शिवशाही बसेस आहेत. मात्र, ५३ गाड्या या सात खासगी कंपनीच्या मालकीच्या आहेत. अहमदाबाद, गुजरात येथील एका खासगी कंपनीने हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन शिवशाही बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र, याचे हप्ते थकल्याने बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे अधिकारी शिवशाहीच्या क्र. एमएच ४६ बीबी ३०५४ आणि क्र. एमएच ४६ बीबी ९०२३ दोन गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले. बस जप्त करण्याच्या नोटिशीसह एसटीच्या माळनाका येथील विभागीय कार्यालयात कंपनीचे प्रतिनिधी कोणतीही पूर्वसूचना न देता
धडकले.

एसटी महामंडळात दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून या गाड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वेळेवर गाड्या न सुटणे, धिमी गती, मार्गावर धावत असताना, मध्येच गाड्या बंद पडणे, चालक प्रशिक्षित नसणे या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत. काही वेळा तर शिवशाहीऐवजी साध्या गाड्या सोडण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढावली आहे. एसटी महामंडळातर्फे याचा दंड खासगी कंपनीकडून वसूल केला जातो.

...तर हप्ते कसे फेडणार?
गाड्यांची पाहणी केली असता, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. टायरमधून तारा बाहेर आलेल्या आहेत. पुढील काचेला तडा गेला असून, ती कधीही फुटण्याचा धोका आहे. गाडीतही अस्वच्छता आहे. जी कंपनी गाडीची देखभाल करू शकत नाही, ती कर्जाचे हप्ते वेळेत कशी फेडणार, असा प्रश्न या वेळी हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांनी केला.
त्या कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसात थकीत पैसे भरतो, अशी ग्वाही दिल्यावर जप्तीची कारवाई न करता फायनान्सचे कर्मचारी कोल्हापूरला परतले आहेत.

Web Title: The installments of the Shivshahi bus were tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.