रत्नागिरी जिल्ह्यात जागते रहोचे निर्देश, सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:09 AM2019-02-28T11:09:07+5:302019-02-28T11:14:05+5:30
पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यानुसार पोलीस व शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
रत्नागिरी : पुलवामा हल्ल्याचा भारताने एअर स्ट्राईकद्वारे बदला घेतल्यानंतर देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. सर्वच पातळ्यांवर जागते रहोचे निर्देश आल्यानुसार पोलीस व शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सागरी किनाऱ्यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
पुलवामामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला. त्यानंतर भारताने १३व्या दिवशी पहाटे पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे प्रशिक्षण तळ हवाई हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त केले. त्यामध्ये ३००पेक्षा अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
मात्र, या हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून वा अतिरेक्यांकडून भारतात घातपाती कारवायांची शक्यता लक्षात घेता सतर्कता असणे आवश्यक आहे.