आंतरजातीय विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:16+5:302021-08-18T04:37:16+5:30
पावस : रत्नागिरी शहराजवळील अनेक ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात येत ...
पावस : रत्नागिरी शहराजवळील अनेक ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. गाेळप येथे झालेल्या लसीकरण शिबिरात कोरोना चाचणी करण्यात आल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
आंतरजातीय विवाह
रत्नागिरी : आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे २५ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या ५१ जोडप्यांना अनुदाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळण्यासाठी ही योजना आहे.
स्वतंत्र मतदान केंद्र
खेड : वाडी जैतापूर, कामिनी वाडी बेलदार यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र मिळावीत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे मतदान केंद्रे दूर असल्याने ५ ते ७ किलोमीटरची पायपीट करून मतदानाचा हक्क बजावत आहेत.
मोबदल्याची प्रतीक्षा
दापोली : तालुक्यातील करंजाळी कोंड पाझर तलावासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला मिळालेला नाही, तसेच या प्रकल्पग्रस्तांचे दाखलेही अद्याप देण्यात आलेले नाहीत. गेल्या ३१ वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
खड्ड्यांमुळे गाड्या पंक्चर
रत्नागिरी : शहर आणि परिसरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा अधिकच वाढली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दुचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढले असून, रात्री-अपरात्री होणाऱ्या या त्रासामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.