गणपतीपुळेत तीन नाक्यांवर तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:37+5:302021-04-26T04:28:37+5:30
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे ग्रामपंचायत व ग्रामकृतीदलाने जाहीर केलेल्या कडक लाॅकडाऊनला रविवारपासून सुरुवात झाली आहे. गणपतीपुळे गावात ...
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे ग्रामपंचायत व ग्रामकृतीदलाने जाहीर केलेल्या कडक लाॅकडाऊनला रविवारपासून सुरुवात झाली आहे. गणपतीपुळे गावात प्रवेश करणाऱ्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.
गणपतीपुळे येथे काेराेनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण तसेच इतर सर्वच गाेष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिले हाेते. तरीही रुग्ण वाहून त्यांची संख्या ३१ वर पाेहाेचल्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत व ग्रामकृतीदल यांची बैठक हाेऊन त्यामध्ये सुमारे पाच दिवसांच्या कडक लाॅकडाऊनला सुरुवात झाली आहे. येथील काही किराणा दुकाने, जनरल स्टाेअर्स, छाेट्या पानटाक्या, हाॅटेल्स, कडकडीत बंद आहेत. गणपतीपुळे आपटा तिठा ते एस. टी. स्टॅण्ड परिसर, मानेवारी, डावरेवाडी रस्ता, काेल्हटकर तिठा ते मंदिर माेरया चाैक, बापट बाेळ, एमआयडीसी मंदिर परिसर या भागात पूर्णपणे शांतता पसरली आहे. काेणीही घराच्या बाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामकृती दलाचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी तपासणी नाक्यावर तैनात आहेत. एका तपासणी नाक्यावर पाच सदस्यांची टीम कार्यरत असून हा तपासणी नाक्यासाठी सकाळी सत्रात ७ ते २ पर्यंत अर्ध सदस्य दुपार सत्रात २ ते ९ या वेळात अर्ध सदस्य कार्यरत राहणार आहेत. याबाबत स्वत: तपासणी नाक्यावर कार्यरत असणारे उपसरपंच महेश केदार यांनी सांगितले की, सकाळपासून एकही गणपतीपुळे गावातील ग्रामस्थ घराबाहेर पडला नसून चांगले सहकार्य ग्रामस्थांनी केले आहे. मात्र बाजूच्या गावातून येणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या तिन्ही सीमा बंद करण्यात आल्या आहेत. विनाकारण फिरणारे बाईकस्वार बाजूच्या गावातून येत आहेत. त्यांना तिन्ही नाक्यावरून परत पाठवले जात आहे. या लाॅकडाऊनमध्ये स्वत: सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, सर्व सदस्य, ग्रामकृतीदल यांनी हा घेतलेला निर्णय याेग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.