जयगड पाेलिसांतर्फे ग्रामस्थांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:26+5:302021-05-05T04:50:26+5:30
रत्नागिरी : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पोलिसांनीही आराेग्य यंत्रणेप्रमाणे घरोघरी जाऊन काम सुरू केले आहे. ग्रामस्थांची ...
रत्नागिरी : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पोलिसांनीही आराेग्य यंत्रणेप्रमाणे घरोघरी जाऊन काम सुरू केले आहे. ग्रामस्थांची ऑक्सिजन तसेच तापमान तपासणी केली जात आहे. जयगडमध्ये सागरी पोलीस स्थानकातर्फे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून ही मोहीम जयगड सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जयगड पोलीस स्थानकाचे कर्मचारी दीपक साळवी, सचिन वीर, बाळकृष्ण खोत, होमगार्ड संदेश धावडे, जयगड सरपंच फरजाना डांगे, पोलीस पाटील विकास परकर, पोलीस मित्र अमोल गायकवाड, नशे राठोड, बंडू राठोड, संभाजी मुंढे, नितीन जाधव, सुशील वझे, आशासेविका साक्षी खाडे, अंगणवाडीसेविका रत्ना रहाटे सहभागी झाले होते.