गुणवत्तावाढीने आयटीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:54+5:302021-08-25T04:36:54+5:30

क्षमतेपेक्षा अधिक अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत मात्र संख्या घटली मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गुणवत्ता वाढल्यामुळे महाविद्यालय प्रवेशाकडे ...

ITI with quality enhancement | गुणवत्तावाढीने आयटीआय

गुणवत्तावाढीने आयटीआय

Next

क्षमतेपेक्षा अधिक अर्ज, गतवर्षीच्या तुलनेत मात्र संख्या घटली

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गुणवत्ता वाढल्यामुळे महाविद्यालय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशाकडे ओढा कमी आहे. त्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मात्र घट झाली आहे.

औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत तुलनेने कमी अर्ज प्राप्त झाले. शहरी तसेच ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जनजागृती करण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्रातील काही महत्त्वपूर्ण ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याने प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागण्याची शक्यता आहे.

ठरावीक अभ्यासक्रमासाठी मोजक्याच जागा आहेत. त्यामुळे गुणवत्तेची खरी कसोटी लागणार आहे. अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असेल तर अकरावी, बारावीनंतरही वेगळा अभ्यासक्रम निवडता येईल. दोन्हीकडे अर्ज भरला आहे.

-एम. ए. खान, रत्नागिरी

वर्षानुवर्षेे काही ठरावीक अभ्यासक्रमासाठी जागा निश्चित आहेत. त्यामुळे प्रवेश मिळत नाहीत. शासनाने चटकन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे गरजेचे आहे. काही अभ्यासक्रमाच्या जागा मात्र शिल्लक राहत आहेत.

- शुभम शिंदे, जयगड

गतवर्षी जिल्ह्यातील २९७२ जागांसाठी ४४०० अर्ज प्राप्त झाले होते. त्या तुलनेत यावर्षी संख्या घटली आहे.

प्रवेशासाठी दि. ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत ३४०० अर्ज प्राप्त झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत एक हजार अर्जाची घट झाली आहे.

ठरावीक अभ्यासक्रमाकडे मात्र कल असल्याने प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागेल, त्यामुळे महाविद्यालय प्रवेशही घेतला आहे.

तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होणाऱ्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा अधिक असल्याने गुणवत्तेचा कस लागतो.

- शशिकांत काेतवडेकर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी

प्रत्येक अभ्यासक्रम नक्कीच महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होते. मात्र विद्यार्थी ठरावीक ट्रेडसाठी गर्दी करतात.

- खालिद कालसेकर, प्राचार्य, हाजी मोहम्मद ठाकूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करंजारी

Web Title: ITI with quality enhancement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.