जे. के. फाईल कंपनीतील अधिकारी मंगेश शिंदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:32 AM2021-05-07T04:32:39+5:302021-05-07T04:32:39+5:30
चिपळूण : दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा, जे. के. फाईल कंपनीचे माजी युनियन लीडर तसेच दसपटीमधील पेंढाबे गावचे माजी ...
चिपळूण : दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा, जे. के. फाईल कंपनीचे माजी युनियन लीडर तसेच दसपटीमधील पेंढाबे गावचे माजी उपसरपंच मंगेश दाजीराव शिंदे (५५) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
काही दिवसांपूर्वी जे. के. फाईल कंपनीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून शिंदे यांच्यावरही उपचार सुरू होते. अशातच शिंदे यांचे निधन झाले. शिंदे हे १२ वर्षे जे. के. फाईल कंपनीत कामगार संघटना अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे पदाधिकारी म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चौकट
कर्मचारी वर्ग पुन्हा धास्तावला
आतापर्यंत जे. के. फाईल कंपनीतील पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी कंपनीतील कामगार संघटनेने कंपनीचे काम थांबवले होते. मात्र कंपनीने जबाबदारी घेत संबंधित कामगारांना कामावर येण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार कामगारांनीही त्याला प्रतिसाद देत काम सुरू केले आहे. मात्र आता पुन्हा कामगार धास्तावले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.