लंडनच्या विमानतळावर ‘जय भवानी जय शिवाजी’ उदय सामंत यांचे महाराष्ट्र मंडळाकडून स्वागत

By मनोज मुळ्ये | Published: October 3, 2023 03:35 PM2023-10-03T15:35:11+5:302023-10-03T15:35:44+5:30

Uday Samant: वाघनखे आणण्यासाठी लंडनला गेलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे लंडनच्या विमानतळावर आगमन होताच तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

'Jai Bhawani Jai Shivaji' Uday Samant received by Maharashtra Mandal at London Airport | लंडनच्या विमानतळावर ‘जय भवानी जय शिवाजी’ उदय सामंत यांचे महाराष्ट्र मंडळाकडून स्वागत

लंडनच्या विमानतळावर ‘जय भवानी जय शिवाजी’ उदय सामंत यांचे महाराष्ट्र मंडळाकडून स्वागत

googlenewsNext

- मनोज मुळ्ये
रत्नागिरी : वाघनखे आणण्यासाठी लंडनला गेलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे लंडनच्या विमानतळावर आगमन होताच तेथील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणाही त्यांनी दिल्या. राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हा दौरा आणि वाघनखे गेले काही दिवस चांगलीच गाजत आहेत.

ठाकरे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे मंत्री सामंत यांचा लंडन दौरा आधीपासूनच गाजत आहे. लंडनमध्ये असलेली वाघनखे खरी आहेत का, असा प्रश्न करुन आदित्य ठाकरे यांनी जोरदार खळबळ उडवून दिली आहे. मंत्र्यांच्या परदेश दौर्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतल्याने ही लंडनवारी आधीपासूनच गाजत आहे. मंत्री उदय सामंत यांनी मात्र कोणीही ओरड केली तरी महाराष्ट्रासाठी ही महत्त्वाची घटना असल्याने हा दौरा होणारच असल्याचे ठामपणे जाहीर केले होते.

लंडनमध्ये असलेली वाघनखे परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत लंडन दौर्यावर गेले आहेत. मंत्री सामंत यांच्या स्वागतासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे सभासद हजर होते. त्यांनी अत्यंत उत्साहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मंत्री सामंत यांचे स्वागत केले. वाघनखे महाराष्ट्रात नेण्याबाबतच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र मंडळाचे अनेक लोक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाबाबत सर्वांमध्ये खूपच उत्साह आणि उत्सुकता आहे.

Web Title: 'Jai Bhawani Jai Shivaji' Uday Samant received by Maharashtra Mandal at London Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.