संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतिपदी जयसिंग माने बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:29+5:302021-03-17T04:32:29+5:30

नवनिर्वाचित सभापती जयसिंग माने यांचे सुभाष बने, विलास चाळके, रोहन बने यांनी अभिनंदन केले. (छाया : सचिन मोहिते) लाेकमत ...

Jaisingh Mane unopposed as chairman of Sangameshwar Panchayat Samiti | संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतिपदी जयसिंग माने बिनविरोध

संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतिपदी जयसिंग माने बिनविरोध

googlenewsNext

नवनिर्वाचित सभापती जयसिंग माने यांचे सुभाष बने, विलास चाळके, रोहन बने यांनी अभिनंदन केले. (छाया : सचिन मोहिते)

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरूख : संगमेश्वर तालुक्याच्या सभापतिपदी कोंडगाव गणाचे शिवसेनेचे जयसिंग माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. माने यांच्या रूपाने साखरपा विभागाला तब्बल तीस वर्षांनंतर सभापतिपद मिळाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे साखरपा विभागात जल्लाेष करण्यात आला.

सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यामुळे सुजित महाडिक यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली. या निवडीवेळी जयसिंग माने यांचा एकच अर्ज दाखल झाला हाेता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांनी काम पाहिले. यावेळी सोबत गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर उपस्थित होते.

सभापती निवडीनंतर माजी आमदार सुभाष बने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संपर्क संघटक नेहा माने, संघटक वेदा फडके, तालुकाप्रमुख प्रमोद पवार महिला व बालकल्याणच्या माजी सभापती रजनी चिंगळे, जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, मुग्धा जागुष्टे, मावळत्या सभापती प्रेरणा कानाल, माजी सभापती सुजित महाडिक, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, कोंडगावचे सरपंच संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार राजन साळवी यांनीही देवरूख पंचायत समितीमध्ये येऊन त्यांचे अभिनंदन केले.

काेट

शिवसेनेमुळेच आज मी सभापती झालो आहे. माझ्यावर जो संघटनेने विश्वास दाखवला आहे आणि ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या मी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तसेच आपण सगळ्यांचा पाठिंबा आणि लक्ष असल्यानेच काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. आमदार खासदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून तालुक्याच्या विकासकामाला चालना देऊ.

- जयसिंग माने, नूतन पंचायत समिती सभापती, संगमेश्वर

Web Title: Jaisingh Mane unopposed as chairman of Sangameshwar Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.