दरड हटवताना नदीत गेला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:19+5:302021-06-19T04:21:19+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करताना रस्ता अचानक खचला आणि जेसीबी दरी जवळच्या नदीत ...

JCB went to the river while clearing the pain | दरड हटवताना नदीत गेला जेसीबी

दरड हटवताना नदीत गेला जेसीबी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करताना रस्ता अचानक खचला आणि जेसीबी दरी जवळच्या नदीत कोसळण्याची घटना आकले तिवरे मार्गावर गुरूवारी दुपारी घडली. जेसीबीचालक जबर जखमी झाला असून, त्याच्यावर लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिपळूणमध्ये कोसळणाऱ्या पावसाने किरकोळ नुकसान केले आहे. मात्र, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर उत्खनन केलेली माती रस्त्यावर आली आहे. आकले - तिवरे मार्गावर मोठ्या पावसात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून दरड हटविण्याचे काम केले जात होते. जेसीबी चालक मुबारक अन्सारी हा अवघड असणारी दरड हटवत होता.

रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर आहे. तर दुसऱ्या बाजूला दरी आणि मोठी नदी आहे. रस्ता ही अरुंद असताना अन्सारी त्यातून दरड बाजूला करीत असताना जेसीबीखालील रस्ता खचला गेला आणि जेसीबी थेट नदीत कोसळला. जेसीबीसह चालक अन्सारी नदीत गेल्याने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी धावाधाव करून अन्सारी यांना बाहेर काढले. सुदैवाने नदीला पाणी कमी होते. त्यामुळे अनर्थ टळला.

------------------------------

चिपळूण तालुक्यातील आकले - तिवरे मार्गावरील दरड हटवताना जेसीबी नदीत काेसळला. या अपघातात जेसीबीचालक जखमी झाला आहे.

Web Title: JCB went to the river while clearing the pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.