जिंदल विद्यालयाने राबवला ‘सफाई बॅंक’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:36 AM2021-07-14T04:36:34+5:302021-07-14T04:36:34+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील जिंदल विद्यामंदिरातर्फे मागील २-३ महिने ‘सफाई बॅंक’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये प्लास्टिकपासून होणारे ...

Jindal Vidyalaya implemented 'Safai Bank' project | जिंदल विद्यालयाने राबवला ‘सफाई बॅंक’ उपक्रम

जिंदल विद्यालयाने राबवला ‘सफाई बॅंक’ उपक्रम

Next

रत्नागिरी : तालुक्यातील जिंदल विद्यामंदिरातर्फे मागील २-३ महिने ‘सफाई बॅंक’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याची विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल किंवा रिसायकलिंग करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

येथील प्रशालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बैठकीत प्लास्टिकची माहिती व त्यातून होणारे पर्यावरणावरील परिणाम सांगण्यात आले. तसेच सफाई बँकेचे महत्त्वही स्पष्ट केले. किमान प्रत्येकाने आपल्या घरातील असणारे प्लास्टिकजन्य घटक हे एकत्र स्वच्छ करून एका पिशवीमध्ये बंद करून सफाई बॅंकेच्या फिरत्या गाडीमध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान ५० पेक्षा जास्त वेगवेगळे प्लास्टिक घटक गोळा केले. आजूबाजूच्या परिसरातील प्लास्टिक घटक तसेच गावागावात जनजागृती करून तेथील प्लास्टिक पिशव्या, इतर वस्तू गोळा करण्याचा मानस या उपक्रमातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी समुद्राच्या लाटेबरोबर आलेले प्लास्टिकजन्य घटक जमा केले, तर काहींनी एस्. टी. स्टॅडवरही जाऊन प्लास्टिक जमवून सफाई बँक उपक्रमात सहभाग नोंदवला.

या उपक्रमाला जे. एस्. डब्ल्यू फाऊंडेशनच्या सी. एस्. आर. विभागाचे सहकार्य लाभले. सी. एस्. आर.विभागाचे प्रमुख तथा व्यवस्थापक अनिल ददिज, कार्यक्रम प्रमुख योगिता महाकाळ, तेजस कवटेकर, तेजस महाकाळ, संतोष नवेले, महेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पेद्दान्ना, शाळेच्या प्राचार्या तृप्ती वराठे, उपक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. सविता पोवार यांनीही कौतुक केले. शिक्षक संदेश पालये, रणजित जाधव, महाजन हाके, सागर फुटक, प्रमोदिनी आग्रे, झिनत गुहागरकर, प्रतीक्षा सुर्वे, प्राची वाघधरे, सायरा गुहागरकर, मनीषा मालप उपस्थित होते. तसेच शिक्षकेतर कर्मचारी अपूर्वा मयेकर, सपना पवार, अक्षता माने, सविता चौघुले, माधवी मयेकर, प्रीती कदम, नेहा वाझे उपस्थित होते.

----------------------------------------

एक हजार टन प्लास्टिक गाेळा

‘सफाई बँक’ म्हणजे एक प्लास्टिकचे वाईट परिणाम थांबविण्याचे उत्तम उदाहरण आहे. जवळपास या दोन-तीन महिन्यांत एक हजार टन प्लास्टिक गोळा केले गेले. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात सुरू राहून प्लास्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचेही ठरविले आहे. या पंचक्रोशीतील जयगड, जे. एस्. डब्ल्यू. टाउनशीप, नांदिवडे, संदखोल, कासारी, चाफेरी, खंडाळा, वरवडे, सांडेलावगण आदी गावांतून प्लास्टिक गोळा केले गेले.

---------------------------------

प्लास्टिकची विल्हेवाट लावताना जिंदल विद्यामंदिर शाळेतर्फे ‘सफाई बँक’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थी सहभागी हाेऊन प्लास्टिक गाेळा करत आहेत.

Web Title: Jindal Vidyalaya implemented 'Safai Bank' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.