रत्नागिरीकरांच्या माथी चिखलातून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:23+5:302021-06-11T04:22:23+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. लाॅकडाॅऊनच्या काळात पाण्याची नवीन पाईपलाईन रत्नागिरी शहर बसस्थानकासमोर टाकण्यात ...

Journey through the mud above Ratnagirikar | रत्नागिरीकरांच्या माथी चिखलातून प्रवास

रत्नागिरीकरांच्या माथी चिखलातून प्रवास

Next

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यात येत आहे. लाॅकडाॅऊनच्या काळात पाण्याची नवीन पाईपलाईन रत्नागिरी शहर बसस्थानकासमोर टाकण्यात येत आहे. त्याचा मुहूर्त पावसाळ्यामध्ये काढण्यात आल्याने गुरुवारी बाजारात आलेल्या नागरिकांना चिखलातून जावे लागले.

गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पाईपलाईन टाकली आहे. त्या रस्त्यावर संपूर्ण भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रत्नागिरी नगर परिषदेकडून गुरुवारी चर खडी भरून बुजविण्याचे काम सुरू केले; मात्र, गुरुवारी लाॅकडाऊन उठल्यानंतर नागरिकांची बाजारात मोठी गर्दी झाली हाेती़, तसेच रहदारी वाढली हाेती़. त्यामुळे सध्या तरी चिखलामधूनच कसरत करत नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.

शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता, पावसाळ्यापूर्वी शहरातील नळपाणी याेजनेसाठीची खुदाई पूर्ण हाेणे आवश्यक हाेते; मात्र नगर परिषदेच्या ढिलाईमुळे हे काम रेंगाळले आहे. त्याचा फटका नागरिकांना साेसावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते चकाचक करण्याचे दिलेले आश्वासनही हवेत विरले असून, नागरिकांना चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागला़.

---------------------------

रत्नागिरी शहरातील बसस्थानकासमाेरील रस्त्यावर नळपाणी याेजनेच्या कामासाठी खाेदलेल्या चरीमुळे माती रस्त्यावर आली हाेती़. (छाया : तन्मय दाते)

Web Title: Journey through the mud above Ratnagirikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.