चिपळुणात जूनमध्ये २३ पाणी नमुने दूषित
By admin | Published: July 4, 2017 07:17 PM2017-07-04T19:17:26+5:302017-07-04T19:17:26+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत नमुन्यांचा अहवाल प्राप्त
आॅनलाईन लोकमत
चिपळूण (जि. रत्नागिरी ), दि. 0४ : तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जून महिन्यात घेतलेल्या तालुक्यातील ३७६ पाणी नमुन्यांपैकी २३ नमुने दूषित आढळून आले आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे १० ते १२ विहिरींचे पाणी दूषित झाले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
तालुक्यात फुरुस केंद्रांंतर्गत तीन नमुने दूषित असून, त्यामध्ये दुर्गवाडी प्रभूकोंड, कुडप मोकासवाडी, हडकणी घागवाडी, वहाळ केंद्रांतर्गत तीन नमुने दूषित असून, त्यामध्ये वडेरु शिंदेवाडी, खांडोत्री बौध्दवाडी, केरे टाकेवाडी, रामपूर केंद्रांतर्गत आंबेरे बुदु्रक बौध्दवाडी, राऊतवाडी, कापरे केंद्रांतर्गत कापरे मधलीवाडी, खरवते केंद्रांतर्गत दहिवली बुद्रुक सुतारवाडी, मिरजोळी चिपळूणकरवाडी, दादर केंद्रांंतर्गत कळकवणे मधलीवाडी, तिवरे भेंदवाडी, खडपोली खालचीवाडी, शिरगाव केंद्रांतर्गत दोन पाणीनमुने दूषित असून, यामध्ये मुंढे शिर्केवाडी व तळसर शिर्केवाडी यांचा समावेश आहे.
तर सावर्डे केंद्रांतर्गत खोतवाडी, सावर्डे पिंपळ मोहल्ला, गुढेकरवाडी, खेरशेत मधलीवाडी, अडरे केंद्रांंतर्गत तिवरे देऊळवाडी, निरबाडे कातकरवाडी येथील पाणीनमुने दूषित आहेत. ज्या गावांमध्ये दूषित पाणीनमुने आढळून आले आहेत, तेथे पुन्हा नमुन्यांची तपासणीचे आदेश दिले आहेत.