जुवळे, निर्मळ, घाग तालुक्यात प्रथम
By admin | Published: December 26, 2014 10:34 PM2014-12-26T22:34:32+5:302014-12-26T23:51:07+5:30
आकृती रेखाटन स्पर्धा : मार्गताम्हाणे येथील विज्ञान प्रदर्शन
चिपळूण : चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळामार्फत आदर्श विज्ञान छंद मंडळांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी वैज्ञानिक आकृती रेखाटन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला असून, युनायटेडची ऋतुजा जुवळे, कळंबट हायस्कूलचा महेश निर्मळ, तर सावर्डे हायस्कूलची आरती घाग तालुक्यात प्रथम आले आहेत.
तालुक्याचा निकाल : प्राथमिक गट : पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक श्रेया मदने प्राथमिक शाळा, खेर्डी सती, द्वितीय क्रमांक संजीव वाघे आर. सी. काळे प्राथमिक विद्यालय, पेढे-परशुराम, तृतीय क्रमांक कोमल सोलकर जिल्हा परिषद शाळा, मार्गताम्हाणे, उत्तेजनार्थ श्रुती बोके लक्ष्मीबाई माटे प्राथमिक विद्यालय, कामथे, इंग्रजी माध्यम पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक रुचिरा डिगे ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, वालोपे, द्वितीय क्रमांक गणेश खेतले नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मिरजोळी, तृतीय क्रमांक सारस कदम मेरी माता स्कूल, खेर्डी व पूर्वा सावंत गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, चिपळूण, उत्तेजनार्थ ऋतुराज आंबवकर एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम, इंग्रजी माध्यम पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक सदिशा सनस एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल परशुराम, द्वितीय क्रमांक देवराज गोवडा इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवण, तृतीय क्रमांक अविनाश कदम धों. दा. इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी-सती, उत्तेजनार्थ निदा मालदार एल. एम. बांदल इंग्लिश मीडियम स्कूल, काविळतळी चिपळूण, मराठी माध्यम पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक ऋतुजा जुवळे युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण, द्वितीय क्रमांक सोनाली वाघे आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम व स्वरुपा खापरे, वसंत देसाई असुर्डे, आंबतखोल, तृतीय क्रमांक साक्षी बांद्रे न्यू इंग्लिश स्कूल, ओमळी, उत्तेजनार्थ दीपाली पिलनकर जनता माध्यमिक विद्यालय, कोकरे, आठवी ते दहावी पटसंख्या कमी - प्रथम क्रमांक महेश निर्मळ न्यू इंग्लिश स्कूल कळंबट, द्वितीय क्रमांक स्वप्नाली रामपूरकर न्यू इंग्लिश स्कूल मुर्तवडे, तृतीय क्रमांक पूजा पवार नायशी हायस्कूल व तेजश्री थोरे श्री रामवरदायिनी विद्यालय, निरबाडे, उत्तेजनार्थ वैभव सुवरे न्यू इंग्लिश स्कूल आबीटगाव, आठवी ते दहावी जास्त पटसंख्या - प्रथम क्रमांक आरती घाग गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे, द्वितीय क्रमांक सिद्धेश गुरव वसंतराव भागव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे व अनुष्का घाग बाळासाहेब माटे माध्यमिक विद्यालय, कामथे, तृतीय क्रमांक रसिका वाघे महादेवराव शिर्के माध्यमिक विद्यालय, भोम, उत्तेजनार्थ सृष्टी सुतार रत्नसागर न्यू इंग्लिश स्कूल, दहिवली, विशेष सर्वसाधारण गट प्रथम क्रमांक आरती दळवी जिल्हा परिषद शाळा, खडपोली, द्वितीय क्रमांक भूषण पंडव दलवाई हायस्कूल, मिरजोळी व अक्षय रहाटे नूतन माध्यमिक विद्यालय, डुगवे शिरवली, तृतीय क्रमांक रागिनी महाजन न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी चिंचघरी सती व सुप्रिया पांचाळ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी, उत्तेजनार्थ संदेश घाग आकले विद्यालय.
स्पर्धेमध्ये तालुक्यातील ५२ शाळांमधून विविध गटातून ५६१६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेऊन आदर्श विज्ञान छंद मंडळ कार्यरत केल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष मोहन के. पाटील (निरबाडे हायस्कूल), उपाध्यक्ष मनोज बी. घाग (शिरवली हायस्कूल), मिलिंद विखारे (ओमळी हायस्कूल), कार्यवाह जगन्नाथ व्ही. पाटील (पेढे परशुराम हायस्कूल) यांनी उपक्रमशील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे आभार मानले आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी श्रीधर जोशी, प्रमोद चिपरीकर, रेवती कारदगे, शैलेश सुर्वे, डी. बी. जगताप, प्रीतम विचारे यांनी प्रयत्न केले. चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी नारायण माळवे व सल्लागार रामदास कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
नव्या वैज्ञानिकांची यातूनच संहिता
1चिपळूण तालुका विज्ञान कृती रेखाटन स्पर्धेत युनायटेड इंग्लीश स्कूलची ऋतुजा जुवळे, कळंबट हायस्कूलचा महेश निर्मळ, सावर्डे हायस्कूलची आरती घाग यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
2तालुका विज्ञान स्पर्धेत विविध भागातील शाळांनी भाग घेतला व त्यातून नव्या वैज्ञानिक संहितेची तयारी सुरू झाली आहे. या ठिकाणी छंद मंडळामार्फत घेण्यात आलेल्या अशा स्पर्धांमधून उद्याचे शास्त्रज्ञ तयार होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.