कडवईचा मास्टरमार्इंड युट्यूबवर लोकप्रिय, चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:45 PM2018-11-01T18:45:53+5:302018-11-01T18:47:31+5:30
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील अभिजीत चंद्रशेखर मोहिरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्ती अशी कामे लिलया करतो. सध्या त्याचे युट्यूबवर मास्टरमार्इंड टेक हे चॅनेल चांगलेच लोकप्रिय होत आहे. यातून तो रिपेरींग, देखभाल, नवीन अॅक्सेसरीज फिटींग यांची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारीत करत असतो. त्याच्या या चॅनेलला वर्षभरात ४ लाखाहन अधिक लोकांनी प्रतिसाद दिला.
मिलींद चव्हाण
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील अभिजीत चंद्रशेखर मोहिरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्ती अशी कामे लिलया करतो. सध्या त्याचे युट्यूबवर मास्टरमार्इंड टेक हे चॅनेल चांगलेच लोकप्रिय होत आहे. यातून तो रिपेरींग, देखभाल, नवीन अॅक्सेसरीज फिटींग यांची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारीत करत असतो. त्याच्या या चॅनेलला वर्षभरात ४ लाखाहन अधिक लोकांनी प्रतिसाद दिला.
अभिजीत मोहिरे याला लहानपणापासून थ्री इडियट सिनेमातल्या रंचूप्रमाणे जी वस्त मिळेल ती खोलून पहायची सवय. त्याने एखादी वस्तू नवीन घेतली तरी ती खोलून तिचा अभ्यास करतो. यातूनच त्याला रिपेअरींगची आवड निर्माण झाली. कॉलेजनंतर बीएड, एमए अशा पदव्या घेतल्यानंतरही त्याचे मन इतर क्षेतात रमत नव्हते. त्याच्या या स्पर्धातून तो संगणक, मोबाईल गाड्यांची दुरुस्ती कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता शिकला.
यातून नवनवीन प्रयोग करत राहिला. डायनामा तयार करणे, ध्वनीलहरीवर प्रयोग करुन रेडिओ तयार करणे असे अनेक नवीन प्रयोग तो लहानपणीच करायचा. गाडी कोणतीही असो. तिचा प्रॉब्लेम तो गाडी न खोलाच सांगू शकतो. मोबाईल असो व संगणक त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करुन त्याचा प्रॉब्लेम शोधण्याचा तो प्रयत्न करतो.
हा छंद जोपासत त्याने यूट्यूबवर मास्टरमार्इंंड टेक या नावाने यू ट्यूब चॅनेल तयार केले आहे. त्यावर तो दुरुस्ती, देखभाल, नवीन अॅक्सेसरीज फिटींग याचे व्हिडीओ अपलोड करतो. आता तर हे व्हिडीओ पाहून लोक रिपेअरींग शिकू लागले आहेत. या यू ट्यूब चॅनेलला जगभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
वर्षभरातच त्याच्या चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक झाले आहेत. व्हिडीओची भाषा हिंदी असल्याने सर्वाधिक लोक याचा फायदा घेत आहेत. तरुणांनी यातून आदर्श घेत आपली कला कौशल्य जोपासत सोशल मिडीयाचा वापर करुन जगापर्यंत पोहोचवली पाहिजेत असा संदेशच जणू यातून समोर येतो.