मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणांचे आमदारांकडून काैतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:39+5:302021-05-21T04:32:39+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील खडपोली निर्मल ग्रामपंचायत यांनी खडपोली येथे ग्रामपंचायतीतर्फे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, त्याची पाहणी ...

Kaituk from the MLAs of the youth who came forward for help | मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणांचे आमदारांकडून काैतुक

मदतीसाठी पुढे आलेल्या तरुणांचे आमदारांकडून काैतुक

googlenewsNext

अडरे : चिपळूण तालुक्यातील खडपोली निर्मल ग्रामपंचायत यांनी

खडपोली येथे ग्रामपंचायतीतर्फे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, त्याची पाहणी आमदार शेखर निकम यांनी केली तसेच आर्थिक मदत केली. गावातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तरुण स्वतःहून मदतीसाठी पुढे आले, याबद्दल शेखर निकम यांनी काैतुक केले.

खडपोली गावातील तसेच येथे औद्योगिक वसाहत असून, काहीकाही कंपन्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचे प्रमाणही वाढले आहे़ गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था व्हावी, या हेतूने हे सेंटर उभारण्यात आले आहे. तालुक्यात कोरोनाची वाढती

रुग्णसंख्या, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अपुरे पडणारे बेड्स हे सगळे बघता प्राथमिक शाळा खडपोली-वाकणवाडी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. डॉ. दुधाळ हे कोविड सेंटरला सहकार्य करणार असून, भविष्यात लागेल तेवढे सहकार्य केले जाईल, असा शब्द दिला. औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे कामगार हे आपल्या जवळचे तसेच आपल्या परिसरातील असल्याने त्यांनाही प्राथमिक उपचार घेता येतील.

यावेळी आमदार शेखर निकम, सरपंच नेहा खेराडे, उपसरपंच मंगेश गोटल, सदस्य महेश मोहिते, सदस्य बबन पवार, सारिका भुवड, अक्षया तांबट, सुभाष शिंदे, ग्रामसेवक रोहिदास हंगे, सुभाष कदम, नीलेश कदम, मनोहर मोहिते, ऋषिकेश कदम, रमेश वरेकर, परेश खेराडे, दिनेश कदम, विवेक मोहिते, नीशा भुवड उपस्थित होते.

Web Title: Kaituk from the MLAs of the youth who came forward for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.