चांदेराई बंदराला गतवैभव प्राप्त करून देणार
By शोभना कांबळे | Published: April 10, 2023 03:49 PM2023-04-10T15:49:07+5:302023-04-10T15:50:21+5:30
चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली
रत्नागिरी : भविष्यातील मत्स्य आधारित व्यवसाय उभारणी ज्यात नौकावहन गतवैभव परत चांदेराई बंदराचे उभारणी नियोजन नदी संवाद यात्रेत करण्यात आले. त्यामुळे चांदेराईतील बंदराला गतवैभव प्राप्त हाेणार आहे. या बंदरात पुन्हा गलबते पाहायला मिळणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली कोंडवी, उमरे व जिल्हा समिती सदस्य, जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली येथे काजळी नदी संवाद यात्रा पार पडली. काजळी नदी काठावरील ग्रुप चिंद्रवली तसेच ग्रुप ग्रामपंचायत चांदेराईमधील सर्व जलप्रेमी ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांनी नदी संवाद यात्रेत सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या विविध प्रशासकीय अधिकारी यांनी नदी संवाद यात्रा ठिकाणी उपस्थित राहून स्थानिक ग्रामस्थांना काजळी नदी संदर्भात नदी संवर्धन अमृतवाहिनी करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
नदी संवाद यात्रा ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवली, उमरे, कोंडवी आणि ग्रुप ग्रामपंचायत चांदेराई, सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मार्गदर्शन ग्रामस्थांना लाभले. या उपक्रमासाठी काजळी नदी संवाद यात्रेची नदी प्रहरी सदस्य व काजळी नदी समन्वय रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाचे समिती उद्घाटन गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तालुका कृषी अधिकारी एन. पी. भोईये, मंडळ कृषी अधिकारी एम. व्ही. बापट, कृषी पर्यवेक्षक आर. के. डवरी, चांदेराईचे कृषी सहायक ठाकरे, कृषी सहायक एस. बी. कदम, वनरक्षक अधिकारी प्रभू सावणे, काजळी नदी नोडल अधिकारी तिरमारे यांचे सहायक अधिकारी आणि काजळी नदी प्रहरी सदस्य उपस्थित हाेते.