Ratnagiri: सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर, सुदैवाने दुर्घटना टळली

By संदीप बांद्रे | Published: July 12, 2023 05:53 PM2023-07-12T17:53:41+5:302023-07-12T17:53:55+5:30

चौपदरीकरणामुळे महामार्ग जुन्या वस्तीला लागून जातो. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांना धोका

Kalandala container at Sawardet house | Ratnagiri: सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर, सुदैवाने दुर्घटना टळली

Ratnagiri: सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर, सुदैवाने दुर्घटना टळली

googlenewsNext

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी सकाळी घडली. या घटनेत घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झालेली नाही.

वहाळ फाटा येथील रहिवासी शशिकांत आत्माराम वारे यांचे घर महमार्गालगतचे आहे. घरासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहने सर्व्हिस रोडने ये जा करतात. बुधवारी चिपळूणकडून रत्नागिरीकडे निघालेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याकडेला येऊन नजीकच्या घरावर कलंडला. यात घराची कौले व भिंतीचे नुकसान झाले. घटनेची सावर्डे पोलिसांना माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

चौपदरीकरणामुळे महामार्ग जुन्या वस्तीला लागून जातो. त्यातून रस्त्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घरांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Kalandala container at Sawardet house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.