राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:55 IST2025-02-21T15:55:22+5:302025-02-21T15:55:51+5:30

पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याचे वर्चस्व

Kalasawali Gram Panchayat in Rajapur is the first in Ratnagiri district to launch Sant Gadge Baba's village cleanliness campaign. | राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

राजापूरमधील कळसवली ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय तर चिखली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला तसेच आणखी तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केली आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींमधून सर्वांत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करण्यात आली होती. त्यातून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची नावे निश्चित करण्यात आली.

प्रथम क्रमांक पटकावलेल्या कळसवली ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या खामशेत ग्रामपंचायतीला ४ लाख रुपये आणि चिखली ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार

स्व. वसंतराव नाईक पुरस्कार
- आबलोली ग्रामपंचायत (गुहागर) (सांडपाणी व्यवस्थापन)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - नाचणे ग्रामपंचायत (रत्नागिरी) (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन)
स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार - उमराठ ग्रामपंचायत (गुहागर) (शौचालय व्यवस्थापन)
या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याचे वर्चस्व

जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ६ पैकी ४ पुरस्कार गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पटकाविले आहेत. त्यामध्ये गुहागर तालुक्याने स्वच्छतेमध्ये द्वितीय पुरस्कार खामशेत ग्रामपंचायतीने तर तृतीय पुरस्कार चिखली ग्रामपंचायतीने तर विशेष पुरस्कार आबलोली आणि उमराठ ग्रामपंचायत यांना जाहीर करण्यात आले आहेत.

Web Title: Kalasawali Gram Panchayat in Rajapur is the first in Ratnagiri district to launch Sant Gadge Baba's village cleanliness campaign.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.