कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

By admin | Published: July 19, 2014 11:36 PM2014-07-19T23:36:33+5:302014-07-19T23:51:16+5:30

‘मेघदूत’ व्याख्यान : यक्षाच्या कथेत काव्याचे सौंदर्य

Kalidasa's poetry blooms with words: Dhanashree Lele | कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

कालिदासाचे काव्य शब्दातून फुलते : धनश्री लेले

Next

रत्नागिरी : कालिदासाच्या मेघदूतातून शाप मिळालेल्या यक्षाची कथा सांगण्यात आली आहे. मात्र कालिदासाने ११६ श्लोकांमधून ही काव्य फुलवले आहे. त्यामुळे रसिकांना व वाचकांना त्याचे शब्दसौंदर्य तर कळते, असे प्रतिपादन धनश्री लेले यांनी केले.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आयोजित ‘कालिदासाचे मेघदूत’ कार्यक़्रमात धनश्री लेले बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन, दाक्षायणी बोपर्डीकर उपस्थित होते.
कालिदासाने स्वत:विषयी कोठेच काही लिहून ठेवलेले नाही. अतिशय मुर्ख माणूस प्रधानाने डावपेच रचून राजकन्येशी विवाह लावून दिला. मात्र हुशार हतबल झाले व तिने वटहुकूम काढून घराबाहेर पाठवले. घराबाहेर पडलेल्या या माणसाने कालिमातेची उपासना केली व कालिदास बनून परत आला. यातून त्यांनी कालिदासाचे थोडक्यात वर्णन करुन त्याच्या काव्याचे व रचनेची माहिती दिली. यक्षाचे वर्णन करताना कालिदासाने त्याला अस्तगमीत या शब्दाने वर्णवले. रामगिरीचे वर्णन करताना सुंदर हिरवाईने नटलेला पर्वत या शब्दात सांगून क्षीण व दुर्बल झालेला यक्ष काळा भिन्न मेघ पाहून हतबल होतो. परंतु अश्रू ओघळू न देता मेघाकडे विनवणी करतो. पत्नीला मेघाद्वारे निरोप पाठवण्यासाठी विनवणी करतो. एकूणच कालिदासाच्या काव्यामध्ये सौंदर्यता नटलेली आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Kalidasa's poetry blooms with words: Dhanashree Lele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.