दोडामार्गातील कळणे भविष्यातील ‘माळीण’ रोखणार कसे? आता तरी राजकीय पक्ष शहाणे होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 12:21 AM2021-08-01T00:21:20+5:302021-08-01T00:22:36+5:30
कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?
सावंतवाडी : कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?कि प्रत्येक जण आपले उखळ पांढरे करत राहिले त्यामुळेच आज अनेक कुटूंबाना आपली घरे वाºयावर सोडून दुसºयाकडे आसरा घ्यावा लागला याला जबाबदार कोण कारण तेव्हाचे समर्थक आजचे विरोधक असल्याने आरोप प्रत्यारोप करून पुन्हा एकदा उरला सुरला डोंगर पोकरायला द्याचा असा तरी यांचा मनसुबा नाही असल्याचे दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पेटून उठणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी व दोडामार्ग चा काहि पट्टे हे मांयनिग क्षेत्र असल्याने त्यांची लीज यापूर्वीच वाटप करण्यात आली आहेत.रेडी येथील मांयनिग हे अनेक वर्षे चालते पण त्यांची कधी वाच्यता झाली नाही मात्र २००९ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील कळणे मध्ये मांयनिग होणार हे जेव्हा लक्षात आले तेव्हा अनेकांनी विरोध केला जनसुनावणी उधळून लावली मात्र नंतर हे मांयनिग तेथे झालेच यावरून मोठया राजकीय घडामोडी घडल्या आंदोलने झाली उपोषणे चालली मात्र यांचा कोणताही फरक तत्कालीन सरकारला पडला नाही अधिकाºयांना वर झाला नाही या सर्व घडामोडीत एक सुरक्षा रक्षकांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन कर्त्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले.त्यातून आज जरी सर्वजण निर्देष सुटले असले तरी तेव्हाचे भिती दायक वातावरण आणि मांयनिग समर्थकांची असलेली दहशत यामुळे आंदोलन ात पडलेली फुट यांचा सर्व फायदा मांयनिग कंपनीला झाल्याचे दिसून आले.
गेल्या दहा ते बारा वर्षात मांयनिग कंपनीचे मालक गब्बर झाले आणि जमिन मालक मात्र न्यायालयीन लढे लढतच असून कळणेचा डोंगर ही शोधवा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.याला जबाबदार कोण असाच प्रश्न पडत आहे.मांयनिग मध्ये मारण्यात आलेले मोठमोठे खडयाचे बांध फुटले आणि गुरूवारी माती आणि पाणी सरळ लोकांच्या घरात गेले आणि लाखो रूपयांंची हानी झाली झालेली हानी सरकार मांयनिग कंपनी देईल पण गेलेला निर्सग परत आणणार कोण मांयनिगच्या नादात अख्खे जंगल तुटले संपूर्ण पणे पर्यावरणाचा ºहास झाला याची जबाबदारी कोण घेणार ते समोर येत नाही
कारण कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय नेत्याचा पाझर फुटण्यास सुरूवात झाली पण हा पाझर फुटतना २००९ मध्ये आता भाजप मध्ये असलेले अनेक नेते काँग्रेस मध्ये होते.आणि मांयनिग समर्थ क म्हणून प्रसिद्ध होते उद्योग आले पाहिजे बड्या मारतना आपलीच माणसे विकासा विरोधात असल्याचे दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते.
मग आता या नेत्याना हरीत लवाद का आठवतो त्यामुळे आता पर्यत कळणे मांयनिग च्या विरोधात जेवढे लढे उभे केले ते सर्व फोल ठरले तसेच हरीत लवादात जाणारे हे ऐकण्यापूरते चांगले पण प्रत्यक्षात कोण कोण जाणार हे येणार काळच ठरवेल पण हा डोंगर भविष्यातील माळीण पासून कसा रोखणार यांचा अभ्यास आता पासूनच अधिकाºयांनी करणे मात्र गरजेचे आहे.