कोमसापचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार
By admin | Published: February 24, 2015 10:06 PM2015-02-24T22:06:50+5:302015-02-25T00:14:13+5:30
मुरबाड शाखेला मान : ५६ शाखांमधून केली समितीने निवड
खालगाव : कोकण मराठी साहित्य परिषदेतील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ५६ शाखांतील वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शाखेला सन्मानपूर्वक प्रमुख अतिथी संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.याच कार्यक्रमात कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे वाङ्मयेतर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यामध्ये गुरुवर्य अ. आ. देसाई वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार कर्जत येथील अॅड. गोपाळ शेळके यांना, राजा राजवाडे वाङ्मयीन कार्यकर्ता पुरस्कार ठाणे येथील प्रा. दीपा ठाणेकर यांना, कोमसापच्या कार्यक्षेत्रात साहित्यविषयक योगदान देणाऱ्या व्यक्तीला, चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी कोकण भूषण पुरस्कार ठाण्यातील साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांना, नमिता कीर कोमसाप ग्रामीण क्षेत्रातील स्त्री लेखिका निशा गुरव (लांजा) यांना, ठाणे जिल्हा क्षेत्रामार्फत पर्यावरण व साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार, बोरिवली येथील जोसेफ तुस्कानो यांना, साहित्य क्षेत्रातील शिक्षकांना दिला जाणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार अमेय देसाई यांना तसेच नगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी कै. सुलोचना मुरारी नार्वेकर, लक्षवेधी पुरस्कार गौरी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण कला अकादमीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर होते. या पुरस्कार कार्यक्रमाला मधु मंगेश कर्णिक, डॉ. महेश केळुस्कर, प्रकाश साळवी, गजानन पाटील, सरपंच साधना साळवी, अरुण नेरूरकर, प्रभाकर नाईक साटम, अचला जोशी, रेखा नार्वेकर, उषा परब आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)