कशेडी घाटात टँकर उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:07 PM2018-11-25T23:07:26+5:302018-11-25T23:07:35+5:30
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सायंकाळी उशिरा रसायन वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला दरीत उलटला. या अपघातात ...
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सायंकाळी उशिरा रसायन वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला दरीत उलटला. या अपघातात टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. जखमी क्लिनरला तातडीने उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई येथून लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल कंपनीत रसायन घेऊन हा टँकर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत उलटला. सुदैवाने हा टँकर दरीत अडकल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच कशेडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टँकरच्या क्लिनरला शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
या टीमच्या बुºहाण टांके, प्रसाद गांधी, विवेक बनकर यांनी टँकरची केबिन तोडून साडेतीन तासानंतर चालकाला बाहेर काढले. या अपघातात चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घाग, आर. के. पाटील, हवालदार शिगवण यांनी वाहतूक सुरळीत करण्यात परिश्रम घेतले.