कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:50+5:302021-06-09T04:38:50+5:30
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक संघटना जिल्हा शाखेच्या ...
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही कोरोनाच्या अनुषंगाने ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल, बक्षीस वितरण व सेवापूर्ती शिक्षकांचा सन्मान कास्ट्राइब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच ऑनलाइन झाला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे शिक्षणाधिकारी मुख्य अतिथी होते. यातील पहिले तीन क्रमांकप्राप्त विजेते असे गट क्र.१ लावण्या नागवेकर, पार्थ गुरव, विराज सुर्वे, उत्तेजनार्थ लुंबिनी कदम व सार्थक जाधव. गट क्र.२ समीर ठोंबरे, वैदेही फुटक, विराज होडे. उत्तेजनार्थ स्वरदा सावंत व शामली धनावडे. शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा : माधव अंकलगे, चित्रा कांबळे, मनाली भुते. उत्तेजनार्थ बाबासाहेब लाड व संदेश झेपले.
यशस्वी स्पर्धकांना संघटनेच्या वतीने आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, पुस्तके व रोख रक्कम देण्यात आली. निबंध स्पर्धेत इयत्ता १ ली ते ५ वी गटात ६३, इयत्ता ६ वी ते ८ वी गटात ९१ विद्यार्थी तर शिक्षक ३१ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सेवापूर्ती शिक्षकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्राने गौरव करण्यात आला. कास्ट्राइब संघटना वाढीसाठी योगदान देणारे कास्ट्राइब महासंघाचे माजी अध्यक्ष डॉ. एस. व्ही. कदम, अध्यक्ष सुधाकर कांबळे, कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संताेष आयरे यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. बबन जोगदंडे यांचे (सरप्रभारी अधिकारी, माध्यम व प्रकाशन केंद्र, यशदा पुणे) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ या विषयीचे व्याख्यान प्रभावी झाले. सुधाकर कांबळे, संतोष आयरे, माजी अध्यक्ष राजेश गमरे, अनंत कदम, सुहास गायकवाड, महावीर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
निबंधाचे परीक्षण दिलीप सावंत, महावीर कांबळे, विक्रम कांबळे, वैष्णवी मोहिते, सुहास गायकवाड, संजय तांबे यांनी केले. छपाई व तांत्रिक सहकार्य दिलीप जाधव सर दापोली, दिलीप सावंत, उमेश मोहिते, लोहार, स्वप्नज मोहिते, आर्यन मोहिते, संस्कार कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय तांबे यांनी केले. संतोष मोहिते यांनी आभार मानले.