Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 04:43 PM2018-08-24T16:43:35+5:302018-08-24T16:47:43+5:30

रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले.

Kerala floods: Ranalyk to Malalya, the trade union organization for Kerala | Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

Next
ठळक मुद्देरत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धावआपत्तीग्रस्तांसाठी धान्य अन् विविध वस्तूरुपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून रवाना

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकामधून केरळकडे रवाना करण्यात आले.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराने थैमान घातले होते. या महापुरात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सुमारे ४०० लोकांचे बळी या महापुराने घेतले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच आर्मीच्या सहाय्याने हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेच. पण, या पुरात येथील नागरिकांचे सर्व काही वाहून गेले. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडा-लत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या राज्यावर आलेल्या आपत्तीत य नागरिकांना सहकार्य करण्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील इतरही राष्ट्र धावून आली आहेत. केरळमधील अनेक लोक रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांनी तत्काळ या लोकांसाठी मदत उभारली.

त्याला येथील व्यापारी संघटनेनेही आर्थिक हात दिला. त्यामुळे एक - दोन दिवसांतच तांदूळ, डाळी आदी धान्ये तसेच गरजेच्या इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. या वस्तूंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला.

सेवाभावी संस्थांकडून मदत

भीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या ६०३१२९७८१४९ या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

लोकमतचाही खारीचा वाटा

केरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलाही हातभार या संघटनांसोबत लागावा, या उद्देशाने लोकमतच्या रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद आदी पदार्थांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.

Web Title: Kerala floods: Ranalyk to Malalya, the trade union organization for Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.