खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:36+5:302021-09-25T04:33:36+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा ...
पाचल : राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत एनएसएस सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत मास्कवाटप कार्यक्रम, प्रबोधनपर पोस्टर्स आणि बॅनर प्रदर्शन, ‘महापूर आपत्तीचे उग्र स्वरूप’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, ऑनलाईन घोषवाक्य लेखन, स्वच्छता उपक्रम, व्याख्यान अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे
या सप्ताहाअंतर्गत महाविद्यालय परिसरात संत्रा, नारळ, लिंबू अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. एस. एस. वाघमारे, प्रा. एस. व्ही. निंबाळकर, प्रा. बी. ए. कश्यप, ग्रंथपाल मनोहर कोंडागुर्ले, मुख्य लिपिक नरेश पाचलकर, सेवक मधुकर साटम, भगवान जाधव उपस्थित होते. या ऑनलाईन उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले आहे.