खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:30 PM2019-01-22T15:30:58+5:302019-01-22T15:32:00+5:30
श्रमदान, ग्रामवर्गणी, नारकर ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची प्रेरणा यातून कोकणी मनात स्ववलंबनाचा हूंकार जागा झाला नि गेल्या चार पिढ्याची खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण हक्काच्या पाणी पुरवठा योजनेने थांबली. योजनेचे उदघाटन सुनिल नारकर टूस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांच्या अध्यक्षतेखाली व विनय रानडे यांचा हस्ते झाले.
रत्नागिरी : श्रमदान, ग्रामवर्गणी, नारकर ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची प्रेरणा यातून कोकणी मनात स्ववलंबनाचा हूंकार जागा झाला नि गेल्या चार पिढ्याची खापरेवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण हक्काच्या पाणी पुरवठा योजनेने थांबली. योजनेचे उदघाटन सुनिल नारकर टूस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांच्या अध्यक्षतेखाली व विनय रानडे यांचा हस्ते झाले.
यावेळी दिपक खापरे, दिपक फेफडे, आण्णा सावंत, ट्रस्टचे संचालक राजेद्र्र लाड, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, अजिंक्य बेर्डे, नवतरूण मंडळाचे नितीन खापरे, शिवसेना शाखा प्रमुख शहाजी शिर्के, सरपंच प्रकाश रांजे उपस्थित होते. राईपैकी खापरेवाडी बावीस उंबऱ्यांची वस्ती. येथे रस्ता, वीज पोहचलेय. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीलाच पुजलेले. डोंगराखालील अर्धार् किलोमिटरवरील शिर्के यांच्या जागेतील ओढ्यात खड्डा खोदून तांब्याने पाणी जमवावे लागते.
प्रत्येक कुटुबांचे ५ ते ६ तास पाणी भरण्यात जाई. त्यामुळे मजुरीला जाता येत नव्हते. दिवस कामात तर रात्र पाण्यात हे जगण येथील महिल्याच्या नसीबी होते. या योजनेमुळे हक्काचे पाणी प्रत्येकाच्या घरात आले.
भाऊ नारकर यांच्या कार्याचा वारसा सांगताना कै. सुनिल नारकर ट्रस्टच्या अध्यक्षा शांता नारकर यांनी ट्रस्टच्या संचालकापुढे खापरेवाडीतील पाणी टंचाईचे गांभिर्य मांडले नि संचालक विनय रानडे यांनी पाईप, मोटारीसाठी दोन लाख रुपये देवू केले. विहीर खोदाई, बांधकाम, चर खोदाई, पाईप जोडणी, वीज खांब उभारणी गावच्या श्रमदानातून झाली.
योजनेस कमी पडणारा निधी कुंटुबामागे आठ हजार रुपयेप्रमाणे जमवून पावणे दोन लाख रुपयांचा स्व-निधी ग्रामस्थांनी बघता-बघता उभा केला. मुंबई मंडळाने भजन व कलेतून एक लाख पाण्यासाठी जमवले नि पावसाळ्यानंतर खापरेवाडीकरांनी एकेक दिवस करीत दोन महिन्यात अनंत व अनिल शिर्के बंधूच्या जमिनीत चाळीस फूटाचा परीघ व वीस फूट खोल विहीरीचे पक्के बांधकाम श्रमातून उभारले.
ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले नि या विहीरीला चौदा फूट खोलीचा मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला. विहीरीच्या वरील भागात वीज मोटार पंप हाऊस उभारले गेले. या लोकसहभागाचे नेतृत्व दिपक गणू खापरे यांनी करताना अंकुश खापरे, चंद्रकांत खापरे, शशिकांत खापरे, संतोष भोसले, प्रकाश पडे, सुविधा खापरे , गीता खापरे, रूपाली खापरे महिपती खापरे नवतरूण मंडळाचे अध्यक्ष सुनिल खापरे यांच्या एकीची साथ मोलाची ठरली.