गणेशोत्सवासाठी खेड आगार सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:34 AM2021-09-05T04:34:54+5:302021-09-05T04:34:54+5:30
दस्तुरी : गणेशाेत्सवात गावी येणाऱ्या गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी खेड आगाराने गाड्यांचे नियाेजन केले आहे. ...
दस्तुरी : गणेशाेत्सवात गावी येणाऱ्या गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी खेड आगाराने गाड्यांचे नियाेजन केले आहे. सुमारे २०० जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यासाठी खेड आगार सज्ज झाले आहे.
या संपूर्ण व्यवस्थेवर आगार व्यवस्थापक प्रशांत करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानकप्रमुख नंदकुमार जाधव, स्मिता पाटील, वंदना कांदोळकर यांच्यासह वाहतूक नियंत्रक काम करत आहेत. दिनांक १४ ते २३ सप्टेंबर या कालावधीत नियोजित वेळेत सुटणाऱ्या बसेस व्यतिरिक्त मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, भांडुप, विठ्ठलवाडी, चिंचवड, पुणे आदी मार्गांवर जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तिकीट आरक्षित करण्याचे काम सुरू आहे. तसेच ग्रुप बुकिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना नियाेजन केलेल्या मार्गांवर प्रवास करायचा आहे, त्यांनी आगाऊ आरक्षण करुन आपला प्रवास सुखकर करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रशांत करवंदे यांनी केले आहे.