खेड पोलिसांची पक्ष्यांप्रती माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:29 AM2021-04-06T04:29:55+5:302021-04-06T04:29:55+5:30
खेड : खेड पोलीस स्थानकांतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्रात एक पक्षी कडक उन्हात तडफडत असल्याचे पाेलिसांनी पाहिले. उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी ...
खेड : खेड पोलीस स्थानकांतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्रात एक पक्षी कडक उन्हात तडफडत असल्याचे पाेलिसांनी पाहिले. उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी तडफडणाऱ्या या पक्ष्याला पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व सहकाऱ्यांनी पाणी पाजून जीवदान दिले.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व सहकाऱ्यांनी पक्ष्यांसाठी प्रत्येक झाडावर ४ ते ५ पाण्याची मडकी बांधून ठेवली आहेत. याठिकाणी झाडावर फळे खाण्यासाठी पक्षी आल्यानंतर या मडक्यातील पाणी पिऊन तृप्त होतात. प्रत्येकाने आपल्या घराची खिडकी, गॅलरी, टेरेसवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. जेणेकरून या कडक उन्हाळ्यात चिमुकल्या पक्ष्यांचे प्राण वाचतील, असे साेमनाथ कदम यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस अंमलदार चरणसिंग पवार, रूपेश जोगी, विनायक येलकर, विशाल धाडवे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.