शिमगोत्सवातील खेळे-संकासुर उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:25+5:302021-04-03T04:28:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : कोकणातील शिमगोत्सवात खेळे-संकासुर हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. गुहागर तालुक्यातही खेळे, संकासूर यांनी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : कोकणातील शिमगोत्सवात खेळे-संकासुर हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. गुहागर तालुक्यातही खेळे, संकासूर यांनी घराेघरी जाऊन गावभाेवनी घेतली.
शिमगाेत्सवात प्रत्येकाच्या घरी जाऊन खेळे-संकासुर आपली कला सादर करतात. नवस फेडला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी संकासुराचे दर्शन होईल की नाही असे सर्वाना वाटत होते. परंतु शासनाला सहकार्य करत नमन मंडळांनी शिमगोत्सव पार पाडला.
शिमगोत्सव हा सण कोकणवासीयांसाठी पर्वणीच असते. फाक पंचमीला पहिली होळी जाळली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नमन मंडळ आपापले खेळे घेऊन गावभोवनीसाठी बाहेर पडले आणि होमाच्या आदल्या दिवशी गावभोवनी करून आपापल्या गावात परत आले.