खेम धरण दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:34+5:302021-06-03T04:22:34+5:30

दापोली : धोक्याच्या पातळीवर असलेल्या हर्णैतील खेम धरणाच्या दुरुस्तीचे काम हे १० जूनपर्यंत पूर्ण होईल आणि धरणाची गळती थांबेल, ...

Khem dam repair work in progress | खेम धरण दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर

खेम धरण दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर

Next

दापोली : धोक्याच्या पातळीवर असलेल्या हर्णैतील खेम धरणाच्या दुरुस्तीचे काम हे १० जूनपर्यंत पूर्ण होईल आणि धरणाची गळती थांबेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला. या धरणाच्या दुरुस्तीसाठी पावणेतीन कोटी रुपये मंजूर झाले असून, या कामाची पाहणी आमदार कदम यांनी केली.

या धरणाच्या पुढील भिंतीचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतर पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतरच धरण ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात येईल. या कामामुळे पाणीसाठा चांगल्याप्रकारे होऊन गावाला मुबलक पाणी पुरवठा करता येईल. धरणातील गाळ काढण्यासाठीही आपले प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा नियोजनमधून त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून घ्यावी लागते. कोरोना महामारीमुळे खूप अडथळे निर्माण होत आहेत, तरीही लवकरात लवकर गाळ काढण्याच्या कामासाठी आपण पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.

धरणाच्या या समस्येसाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच अनेक तत्कालिन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाला यश येत नव्हते. पावसाळ्यात धरण तुडुंब भरल्यानंतर त्याला गळती लागते. त्यामुळे धरण फुटण्याची भीती लोकांच्या मनात आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही माहिती आली की, लोकप्रतिनिधी धरणाला भेट देतात व पुढे काहीच होत नाही. मात्र, आता आमदार योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाठपुरावा करुन धरण दुरुस्तीचे काम मार्गी लावले आहे.

आमदार कदम यांनी दोन वर्षांपूर्वी खेम धरणाची पाहणी करून त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यास सुरूवात केली होती. मात्र, धरण ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने जिल्हा परिषदेकडून काही कोटी रुपयांचा निधी मिळणे अशक्य होते. त्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी लक्ष घातले आणि जिल्हा परिषदेच्या ताब्यातील हे धरण जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले. या प्रक्रियेला फार वेळ गेला. धरण वर्ग झाल्यानंतर रामदास कदम यांच्या प्रयत्नाने या धरणाच्या दुरूस्तीला शासनाकडून २ कोटी ४५ लाख रूपये निधी मंजूर झाला.

सध्या धरण दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. त्याची पाहणी आमदार योगेश कदम यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती भगवान घाडगे, उपतालुका प्रमुख प्रकाश कालेकर, रविराज चिखले, माजी सभापती रऊफ हजवाने, हर्णैचे उपसरपंच महेश पवार, अंकुश बंगाल, सोमनाथ पावसे, महिला आघाडी विभाग संघटक संजना गुरव, शाखाप्रमुख कैलास नागवेकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी गुरव, सना काझी, मानसी यादव, पूनम पावसे, राकेश तवसाळकर, इस्माईल मेमन, इमरान कोतवालकर, युवा सेना उपविभाग अधिकारी साहील बोरकर, अस्लम खान, विक्रांत मळेकर उपस्थित होते.

Web Title: Khem dam repair work in progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.