पाटपन्हाळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:41+5:302021-06-11T04:21:41+5:30
असगोली : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात अनेक कामे ठेकेदाराकडून अपुरी राहिली आहेत. मात्र, याचा नाहक त्रास प्रवासी, ...
असगोली : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात अनेक कामे ठेकेदाराकडून अपुरी राहिली आहेत. मात्र, याचा नाहक त्रास प्रवासी, वाहनचालकांना होत आहे. पाटपन्हाळे-शृंगारतळी मार्गावर गटार खोदाईचे काम करताना ठेकेदाराने मातीचे ढीग काँक्रिट रस्त्यावर टाकलेले दिसून येत आहेत. त्यामुळेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
चिखलामुळे दुचाकीवाले घसरत आहेत. ही कामे पावसाआधी पूर्ण होणे गरजेचे होते, असे वाहनचालकांतून बोलले जात आहे़ त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या महामार्गावरील पुलांची कामे व त्यांना जोडलेले रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. तसेच काही ठिकाणी पुलाला जोडलेला रस्त्याचे काँक्रिट खचलेले दिसून येत आहे. या मार्गावरील गटाराची खोदाई सुरू असून, त्यातील माती रस्त्यावरच ढीग करून ठेवण्यात आल्याने पावसाने माती क्राँकिटच्या रस्त्यावर येत असून त्यामुळे चिखल होत आहे. ज्या पुलांची कामे झाली आहेत. त्या पुलांना जोडलेले रस्त्यामध्ये डांबर टाकलेली नसल्याने वाहने आपटत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.