साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आल्याचा किरीट सोमय्यांचा दावा फोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:02 PM2022-12-04T16:02:06+5:302022-12-04T16:02:31+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे.

Kirit Somayya's claim that Sai Resort water is released directly into the sea is false | साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आल्याचा किरीट सोमय्यांचा दावा फोल

साई रिसॉर्टचे पाणी थेट समुद्रात सोडण्यात आल्याचा किरीट सोमय्यांचा दावा फोल

Next

शिवाजी गोरे 

दापोली 

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरण गेले अनेक दिवस वादात सापडले आहे. अलीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्ट चे पाणी थेट समुद्रात सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हाणी होत असल्याचे ट्विट केले होते, परंतु अधिकाऱ्यांच्या पाहणीत वेगळेच सत्य बाहेर आले आहे, शोष खड्याचे पाणी थेट समुद्रात जात नसल्याचे दिसून आले आहे.   3 डिसेंबर रोजी महसूल, पर्यावरण प्रदूषण अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत  साई रिसॉर्ट चे पाणी थेट समुद्रात जात नसल्याचे दिसून आले आहे.  

हॉटेल पासून काही अंतरावर सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी टाकी आढळून आली आहे. परंतु समुद्रा पासून काही अंतरावर बांधण्यात आली असल्याने त्या टाकी ला कोणताही पाईप जोडून समुद्रात थेट पाणी सोडण्यात आले नसल्याचे दिसून आल्याने केलेला दावा फोल ठरला आहे.
मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट सुरू होण्या आधीच वादात सापडले, परंतु बंद हॉटेल चे पाणी थेट समुद्रात जात असल्याने प्रदूषणाची हाणी झाल्याचा आरोप झाला आहे.

Web Title: Kirit Somayya's claim that Sai Resort water is released directly into the sea is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.