रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सवही हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 11:06 AM2021-02-19T11:06:07+5:302021-02-19T11:08:15+5:30
Religious programme Ratnagirinews- गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून, येत्या २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यू-ट्युबवर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करणे टाळून ऑनलाईन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रत्नागिरी : गेल्या २०१२ सालापासून रत्नागिरीत सुरू असलेला कीर्तनसंध्या महोत्सव आता जगभरातील कीर्तनप्रेमींना ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. कीर्तनसंध्येच्या दशकपूर्तीनिमित्ताने ही व्यवस्था सुरू करण्यात येत असून, येत्या २१ फेब्रुवारीपासून महोत्सवातील कीर्तने यू-ट्युबवर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करणे टाळून ऑनलाईन पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारगिल युद्धाचे वर्णन हा यावर्षीच्या कीर्तनमालिकेचा मुख्य विषय आहे. भारताचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी कीर्तन हे माध्यम निवडावे, असे ठरले आणि २०१२ साली कीर्तनसंध्या समूह स्थापन झाला. अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, मकरंद करंदीकर, गुरुप्रसाद जोशी, रत्नाकर जोशी, योगेशानंद हळबे, योगेश गानू, मोरेश्वर जोशी, मिलिंद सरदेसाई, अभिजित भट, गौरांग आगाशे, श्रीनंदन केळकर, महेंद्र दांडेकर इत्यादी मंडळी त्यासाठी एकत्र आली. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांची त्याला सक्षम साथ लाभली.
या उपक्रमात मुख्य विषयांबरोबरच महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यक्रांतिकारक वासुदेव फडके अशा अनेक शूरवीर व्यक्तिमत्त्वांची ओळखही आफळेबुवांनी करून दिली. कीर्तनाचे गर्दीचे उच्चांक मोडणारा राज्यभरातील हा एकमेव उपक्रम ठरला आहे.
वादक कलाकार हेरंब जोगळेकर, मधुसूदन लेले, उदय गोखले, अभिजित भट, राजा केळकर, विलास हर्षे, वरद सोहोनी, मिलिंद टिकेकर, प्रथमेश तारळकर, राजू धाक्रस, मंगेश चव्हाण, केदार लिंगायत, वैभव फणसळकर, राजू किल्लेकर, हरीश केळकर, उदयराज सावंत, नेपथ्य अमरीश सावंत, चंदन खेराडे व इतर तंत्रज्ञांचीही उपक्रमाला मदत लाभली. त्यामुळे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढली आहे.