रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून एकावर चाकूने हल्ला, एक जखमी
By मनोज मुळ्ये | Published: December 16, 2023 06:10 PM2023-12-16T18:10:06+5:302023-12-16T18:11:14+5:30
रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत प्रौढावर चाकू उगारल्याने त्यात त्यांचा मेहुणा जखमी झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात ...
रत्नागिरी : क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत प्रौढावर चाकू उगारल्याने त्यात त्यांचा मेहुणा जखमी झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात गुरुवारी रात्री घडली. ओमकार शिंदे असे जखमी झालेल्याचे नाव असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यशवंत शांताराम सावंत (५१, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय असून, गुरुवारी रात्री त्यांचा शेजारी ओमकार शिंदे याचा भाऊजी प्रशांत ठावरे हा सावंत यांच्या घराजवळ आला. त्याच्यासाेबत शंकर तारवे ऊर्फ अपी, साैरभ तारवे आणि विजय चव्हाण हेही हाेते. यावेळी प्रशांत ठावरे यांनी ‘माझा मेहुणा ओमकार शिंदे तुमच्याकडे कामाला येणार नाही,’ असे बाेलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी विजय चव्हाण याने त्याच्याजवळील चाकू यशवंत सावंत यांच्यावर उगारला. प्रसंगावधान राखत ते बाजूला झाले असता, हा चाकू त्यांचा आतेभाऊ मंगेश रामचंद्र जाधव यांच्या डाव्या खांद्याला लागला. त्यामध्ये त्यांना दुखापत झाली. त्यानंतर प्रशांत ठावरे, शंकर तारवे, साैरभ तारवे यांनी सावंत यांना मारहाण केली. तसेच कोयता दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे