Ratnagiri News: कोदवली धरण भरले, राजापूरकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन मिटले

By अरुण आडिवरेकर | Published: June 27, 2023 06:38 PM2023-06-27T18:38:57+5:302023-06-27T18:40:03+5:30

विनोद पवार राजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात झालेला खडखडाट, त्यातच लांबलेला पाऊस यामुळे गेले दोन ते ...

Kodavali Dam was filled, Rajapurkar tension of water shortage was resolved | Ratnagiri News: कोदवली धरण भरले, राजापूरकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन मिटले

Ratnagiri News: कोदवली धरण भरले, राजापूरकरांचे पाणीटंचाईचे टेन्शन मिटले

googlenewsNext

विनोद पवार

राजापूर : शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणात झालेला खडखडाट, त्यातच लांबलेला पाऊस यामुळे गेले दोन ते अडीच महिने शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या. पावसामुळे कोदवली धरण तुडुंब भरल्याने आता शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत पूर्ववत नियमीत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.

मार्च महिन्यात कोदवली धरणात खडखडाट झाला हाेता. केवळ शीळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरठा अवलंबून होता. मात्र, शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रारंभी एक दिवसाआड तर त्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाऊस लांबल्याने आणखीच पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या. शहरातील अनेक भागात तीन ते चार दिवसआड पाणीपुरवठा सुरू होता.

या काळात राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी शहरातील नागरिकांना टँकरने पाणीपुरठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच नगर परिषद प्रशासनाकडूनही मुख्याधिकारी प्रशांत भोसले व कर्मचाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा शहरात पुरविण्यासाठी प्रयत्न केले.

अखेर मान्सून सक्रिय झाला असून, कोदवली धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्णपणे भरून वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या साठवण टाकीत मुबलक पाणीसाठा झाला आहे. मुबलक पाणीसाठा झाल्याने शहरातील सर्व भागात पूर्ववत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.

Web Title: Kodavali Dam was filled, Rajapurkar tension of water shortage was resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.