कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी परिषदेच्या केंद्रांसोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:38 PM2019-10-12T16:38:50+5:302019-10-12T16:39:46+5:30

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Konkan Agricultural University has a Memorandum of Understanding with the Centers of Agriculture Council | कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी परिषदेच्या केंद्रांसोबत सामंजस्य करार

कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी परिषदेच्या केंद्रांसोबत सामंजस्य करार

googlenewsNext
ठळक मुद्देकोकण कृषी विद्यापीठाचा कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करारविभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी - पुणे, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालय, पुणे आणि राष्ट्रीय अजैविक ताण संस्था, बारामती या भारतातील तीन नामांकित संशोधन संस्था आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे अध्यक्षतेखाली सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी - पुणे संस्थेच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालय, पुणे संस्थेचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद आणि राष्ट्रीय अजैविक ताण संस्था, बारामती संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे उपस्थित होते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे डॉ. सतीश नारखेडे, शिक्षण संचालक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यांचे उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी - पुणे, पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशनालय, पुणे आणि राष्ट्रीय अजैविक ताण प्रबंधन संस्था, बारामती या तीनही संशोधन केंद्रांमध्ये उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध असल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळूण भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत कुलगरु डॉ. संजय सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title: Konkan Agricultural University has a Memorandum of Understanding with the Centers of Agriculture Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.