अन्नधान्य घेऊन मालगाडी आली रत्नागिरीत; कोकण रेल्वेतून आले २,६५५ टन धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:00 PM2020-04-17T17:00:07+5:302020-04-17T17:02:07+5:30
कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणातील सर्वसामान्य लोकांना कोरोनाच्या काळात वितरण केले जाणारे धान्य शुक्रवारी कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणात आणले गेले आहे. रत्नागिरीरेल्वे स्थानकात शुक्रवारी ४२ वॅगन मालगाडीतून २,६५५ टन धान्य आणण्यात आले.
कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. अन्नधान्य भरलेली ४२ वॅगनची मालगाडी रत्नागिरीमध्ये शुक्रवारी दाखल झाली आहे. या माल गाडीतून २,६५५ टन धान्य रत्नागिरी जिल्ह्यासाठी दाखल झाले आहे.
हे धान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून जिल्हा भर वितरीत करण्यात येणार आहे. कोरोनानंतर सर्वत्र लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे धान्य ही कोकण रेल्वेच्या माध्यमातून झाराप स्थानकावर उतरवण्यात आले आहे. तर रो रोच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूची नियमित वाहतूक सुरू आहे. या राष्ट्रीय संकटाच्या काळात सर्व आवश्यक त्या खबरदारी घेत कोकण रेल्वे जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाचे काम करत आहे.