खेड रेल्वे स्थानकात गोंधळ; मांडवी एक्सप्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 09:05 PM2019-09-08T21:05:53+5:302019-09-08T21:12:16+5:30
गणेशोत्सवसाठी कोकणात गेलेल्या लोकांची मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
खेड: मडगावहून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबली, मात्र ट्रेनमधील प्रवाशांनी प्रचंड गर्दी असल्यामुळे एक्सप्रेसचा दरवाजा न उघडल्याने संतप्त झालेल्या स्थानकातील प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालत गोंदळ घातला.
गणेशोत्सवसाठी कोकणात गेलेल्या लोकांची मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच आज (रविवारी) खेड येथून प्रवाशांनी मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेसचे तिकीट बुकींग केले होते. परंतु ट्रेन पूर्णपणे भरल्याने ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवाशांनी एक्सप्रेसचे दरवाजेच न उघडल्याने काही वेळानंतर ट्रेन अखेर सुटली. मात्र बुकींग करुन सुद्धा खेड स्थानकावरच रहावे लागल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालत गोंदळ घातला.
तसेच हा प्रकार झाल्यानंतर अर्धा तासाने हॉलिडे एक्सप्रेस येत असल्याची घोषणा करण्यात आली. या ट्रेनला अतिरिक्त डबे असल्याचे कोकण रेल्वेकडून प्रवाशांना सांगण्यात आले. मात्र यामध्ये काही प्रवाशांना दिलासा मिळाला, तर हॉलिडे एक्सप्रेसही भरून आल्याने परिणामी प्रवाशांनी या गाडीच्या एसी डब्याची तोडफोड केली. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि रोष पाहता कोकण रेल्वेने खेड स्थानकात काही गाड्यांना विशेष थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.