नियोजनाअभावी कोकण रेल्वे विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:53 PM2017-08-31T22:53:39+5:302017-08-31T22:53:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही बिघडलेलेच आहे. जादा गाड्यांचे कारण दिले जात असले तरी दररोज मार्गावरून धावणाºया ८ मालगाड्या व ५ रो-रो गाड्यांबाबत योग्य नियोजन केले नसल्यानेही प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. महामार्गावर ज्याप्रमाणे अवजड वाहनांची वाहतूक काही काळ थांबविली जाते त्याप्रमाणेच गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दररोज ५० पेक्षा अधिक नियमितपणे धावणाºया गाड्या आहेत. गणेशोत्सव काळात भक्तांसाठी कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने २५० जादा फेºयांची सोय केली. याबाबत प्रवाशांमध्ये समाधान आहे. मात्र, जादा गाड्या सोडल्याने क्रॉसिंगला वेळ जात असल्याने गाड्यांना उशीर होत असल्याचे जे कारण सांगितले जात आहे, ते अर्धसत्य आहे. जादा गाड्यांबरोबरच दररोज मार्गावर धावणाºया मालवाहू गाड्यांची संख्या उत्सव काळात काही दिवस कमी करणे किंवा थांबविणे याबाबत कोकण रेल्वेने नियोजन करण्याची आवश्यकता होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मार्गावर अनेक ठिकाणी मालवाहू रेल्वे गाड्यांना क्रॉसिंग देण्यासाठी अनेक प्रवासी गाड्या काही स्थानकांवर तास तासभर उभ्या करून ठेवल्या जात आहेत. प्रवासी गाड्यांच्या क्रॉसिंगबाबतही हीच स्थिती आहे. यातील मालवाहू गाड्यांची संख्या उत्सवकाळात काही प्रमाणात कमी करता आली असती तरीही प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बºयापैकी सावरता आले असते. याबाबत पुढील उत्सवांच्या काळात कोकण रेल्वेकडून नियोजन अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रियाही प्रवाशांनी व्यक्त केल्या.