देखभाल इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळीत 

By मनोज मुळ्ये | Published: August 26, 2024 04:10 PM2024-08-26T16:10:18+5:302024-08-26T16:11:02+5:30

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी रेल्वे ...

Konkan Railway traffic was disrupted for two hours due to engine shut down for maintenance  | देखभाल इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे वाहतूक दोन तास विस्कळीत 

संग्रहित छाया

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. यामुळे गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सी. एम. एस. मशीन अचानक बंद पडल्यामुळे या भागातून याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली -एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या.

या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजल्याने अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी २४ तास सतर्क असलेली कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाली. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १०:२४ वाजता बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.

Web Title: Konkan Railway traffic was disrupted for two hours due to engine shut down for maintenance 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.