गणेशभक्त रखडले; कोकण रेल्वेच्या गाड्या २ ते ५ तासाने उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 10:41 PM2019-09-01T22:41:33+5:302019-09-01T22:43:38+5:30
कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात.
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्या होत्या. मात्र, या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या २ ते ५ तासाने उशिराने धावत होत्या. त्यामुळे कोकणात येणारे गणेशभक्त अर्ध्या वाटेतच लटकले होते.
कोकणात गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल होत असतात. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्यांची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या २१० फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. बहुतांशी मुंबईकरांनी कोकण रेल्वेनेच येणे पसंत केले होते. त्यामुळे या मार्गावरून धावणाºया गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती. जनरल डब्यांबरोबरच आरक्षणाच्या डब्यात बसून प्रवाशांनी आपल्या गावी येणे पसंत केले होते. त्यामुळे गाडीचे सर्वच डबे फुल्ल झाले होते. मिळेल तिथे बसून अनेकांनी प्रवास करणे पसंत केले.
मात्र, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रडतकढतच झाला. या मार्गावरून धावणाºया सर्वच गाड्या २ ते ५ तासाने उशिराने धावत होत्या. यामध्ये ०१०३५ पनवेल - सावंतवाडी गणपती स्पेशल गाडी ३९ मिनिटे, १२६१८ मंगला एक्स्प्रेस ३६ मिनिटे, १०१०३ मांडवी एक्स्प्रेस २९ मिनिट, ०२१९८ जबलपूर स्पेशल ५ तास ५१ मिनिटे, ०१००१ सावंतवाडी गणपती स्पेशल ५ तास ४८ मिनिटे, १२०५१ जनशताब्दी एक्स्प्रेस ५६ मिनिट, १२४५० गोवा संपर्कक्रांती २ तास २२ मिनिटे, ०१२२५ पनवेल - सावंतवाडी २ तास ५४ मिनिटे, २२४१४ राजधानी एक्स्प्रेस २ तास १९ मिनिटे, ११००३ दादर - सावंतवाडी १ तास २५ मिनिटे, १२१३३ मंगलोर एक्स्पे्रस २ तास २२ मिनिटे, १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस ९ तास ४६ मिनिटे, २२११३ कोचूवेली एक्स्प्रेस ४ तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे या गाड्यांनी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरून घरी पोहोचण्यासही उशीर झाला.