कोकण हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला : सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:51+5:302021-03-27T04:32:51+5:30

लांजातील काॅंग्रेसच्या कार्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या बैठकीत सत्यजित तांबे यांनी मार्गदर्शन केले. लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : कार्यकर्त्यांमध्ये तळमळ ...

Konkan is the stronghold of Congress ideology: Satyajit Tambe | कोकण हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला : सत्यजित तांबे

कोकण हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला : सत्यजित तांबे

Next

लांजातील काॅंग्रेसच्या कार्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या बैठकीत सत्यजित तांबे यांनी मार्गदर्शन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : कार्यकर्त्यांमध्ये तळमळ असली पाहिजे. पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते या कोकणामध्ये मोठ्या संख्येने आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही या कोकणातला कार्यकर्ता हा पक्षाचा झेंडा घेऊन पक्ष व विचार टिकवण्याचे काम करत आला आहे. त्यामुळे राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघातील मागील निवडणुकीत झालेला निसटता पराभव हा काँग्रेसचा पराभव नसून, तो विजयच आहे, असे प्रतिपादन युवक महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लांजा येथे केले.

काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर आले असता, त्यांनी लांजा येथील पक्ष कार्यालयात मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुका लढविण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. यामध्ये अनेक लोक जोडले जात आहेत. अनेकजण पराभूत जरी झाले असले, तरी त्यांनी आपल्या भागात आपले वलय निर्माण केले आहे. या माध्यमातून तळकोकणात चांगले संघटन पाहायला मिळत आहे. राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या विचारांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सन २०२४ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत नवनवीन चेहरे, नवीन युवकांना संधी दिली जात आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदामध्ये अडकून न पडता, आपणाला उपलब्ध झालेली संधी आहे, ती एक पायरी समजून त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे पाहावे, असे सांगितले. राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार नक्कीच निवडून आलेला असेल, यात शंका नाही, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शांताराम गाडे, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, श्रीकृष्ण हेगिष्ट्ये, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, चंद्रकांत परवडी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Konkan is the stronghold of Congress ideology: Satyajit Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.