कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस उद्यापासून विजेच्या इंजिनवर धावणार, प्रवास वेगवान होणार

By अरुण आडिवरेकर | Published: October 7, 2022 06:45 PM2022-10-07T18:45:21+5:302022-10-07T18:54:12+5:30

जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार

Konkankanya, Mandvi Express will run on electric engine from tomorrow | कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस उद्यापासून विजेच्या इंजिनवर धावणार, प्रवास वेगवान होणार

संग्रहित फोटो

googlenewsNext

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावरील गाड्या विजेवर धावू लागल्या आहेत. या मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्या ८ ऑक्टोबरपासून विजेच्या इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त आणि अधिक वेगवान होणार आहे.

काेकण रेल्वे मार्गाच्या ७४१ किलोमीटर मार्गाचे मार्चमध्ये विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने गाड्या विजेवर धावण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मालवाहतूक गाड्या विजेच्या इंजिनवर धावत होत्या. त्यानंतर पॅसेंजर गाड्या विजेवर धावू लागल्या. आता या मार्गावरील एक्स्प्रेस गाड्याही इंजिनवर धावणार आहेत.

जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीच्या प्रवासात दोन तास दहा मिनिटांनी बचत होणार आहे. या गाडीचा नंबरही बदलणार आहे. रेल्वे क्रमांक १०१११/१०११२ मडगाव - सीएसएमटी कोकणकन्या आणि रेल्वे क्रमांक १०१३०/१०१०४ मडगाव - सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस उद्या ८ ऑक्टोबरपासून विजेवर धावणार आहेत.

Web Title: Konkankanya, Mandvi Express will run on electric engine from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.