कोकणच्या पर्यटनाला नशेचा विळखा !

By admin | Published: September 30, 2016 11:50 PM2016-09-30T23:50:04+5:302016-10-01T00:19:22+5:30

दापोलीला गालबोट : नशेमुळे मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ; स्थानिकांना अत्यंत वाईट अनुभव

Konkan's tourism is addictive! | कोकणच्या पर्यटनाला नशेचा विळखा !

कोकणच्या पर्यटनाला नशेचा विळखा !

Next

दापोली : कामाच्या तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी दापोलीला चांगलीच पसंती दिली असल्याचे पर्यटकांच्या वाढत्या संख्येवरून समोर येत आहे. परंतु या क्षेत्रामध्ये मात्र पर्यटक मद्यप्राशन जास्त प्रमाणात करीत असल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्यामुळे पर्यटनाला चक्क नशेचा विळखा बसल्याचे दिसत आहे. दापोलीत येणारे पर्यटक मौजमजेसाठी येतात की, नशेचा आनंद लुटण्यासाठी येतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दापोलीत पर्यटनाला येणारे पर्यटक पुरूष ग्रुपने येतात तर काही आपल्या कुुटुंबाबरोबर येतात. परंतु पुरूष गटाने येणाऱ्या मंडळींमध्ये दारूची नशा करणारे अनेक चेहरे असल्याने नशा चढल्यावर त्यांच्या वागण्यात बदल होतो. नशेत असलेल्या पर्यटकांच्या वाईट वर्तवणुकीचा इतर पर्यटक मंडळींसह स्थानिक ग्रामस्थांना त्रास होऊ लागला आहे. यामध्ये कधी मारामारी करणे, शिविगाळ करणे, मद्यपान करून भरधाव वेगानेगाडी चालवणे असे प्रकार आजकाल सागरी किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या साऱ्याचा फटका मात्र इतर पर्यटक मंडळींना बसण्याची शक्यता सध्या दापोली पर्यटन ठिकाणच्या गावातून व्यक्त करण्यात येत आहे. कचरा करू नये, अपूर्ण कपड्यात फिरू नये, अशा प्रकारची बंदी स्थानिक प्रशासनाकडून घातली आहे.
यावर्षी पाळंदे येथे काही पर्यटक युवकांनी मद्याच्या नशेत मारामारी केली होती. केळशी येथे स्थानिकांवर चाकूने हल्ला केला होता. त्यांच्यावर दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सागरी किनाऱ्यावर नशेमध्ये भरधाव गाडी चालविणे, मारामाऱ्या करणे आदी गैरप्रकार वाढले आहेत. स्थानिकांच्या पुढाकाराने सदर व्यक्तीस समजावण्यात येते. २४ सप्टेंबर रोजी कर्दे-मुरूडच्या मध्य भागात एका पर्यटकाची गाडी समुद्राच्या पाण्यात उलटली आणि त्यात त्याचा मृत्यूदेखील झाला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार सदर युवक मद्यधुंद अवस्थेत होते. अशा मद्यप्राशन करणाऱ्या पर्यटकांमुळे इतर पर्यटकांच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गाड्या घेऊन पर्यटक समुद्रावर जातात आणि आपल्याला वाटेल तशा चालवतात. त्यामुळे पायी सफर करणाऱ्या पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

मुंबई, पुणे, गोवा, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणांहून पर्यटक दापोलीला पर्यटनासाठी येतात आणि नशेत मौजेमजा करतात. गेल्या पाच ते सहा वर्षात सुमारे १ कोटीपेक्षा अधिक पर्यटकांनी दापोली शहराला भेट दिली होती, तर यावर्षी एप्रिल ते मे या महिन्यामध्ये जवळपास २९ हजार २००पेक्षा अधिक पर्यटक दापोली शहरात पर्यटनाला आल्याचा आकडा समोर आला आहे.

Web Title: Konkan's tourism is addictive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.